शांत झोप

उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेजण छान झोपतो .
कधी कुठे आहे तसं झोपावं हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे पण आपण शांत झोपताना कोणीच हा विचार करत नाही की आपल्यामुळे आज त्याचं मन दुखावले गेले त्याला झोप लागली असेल का ?
या कुशीवरून त्या कुशीवर आपण सहज पणे पडतो तेव्हा तो तळमळत असेल का ?
त्याची उशी शब्दांनी घायाळ होऊन अश्रूं मुले भिजली असेल का ?

प्रश्न अगदी सोपे आहे पण कधीही आपण होऊन मनात नाही येणारे न आलेले म्हणूनच विचार करा
शक्य होईल तेवढा हा विचार मनात ठेवूनच जगा कुणाचंही मन न दुखवता जगण्याचा प्रयत्न करा आणि चुकून कोणाचे मन दुखावले गेले तर मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरु नका म्हणजे शांत झोप आपल्यालाही लागेल आणि त्यालाही…