शाळा………..एक अविस्मरणीय अनुभव..!

shalaनुकत्याच उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या आणि शाळेची लगबग सुरु झाली.शाळेचा पहिला दिवस मुलांसाठी अतिशय उत्सुक्याचा आणि वेगळ्या अनुभवाचा ठरला. नवीन वर्ग,नवे शिक्षक,नवी कोरी पुस्तके,वह्या शाळेच दप्तर,पाण्याची बाटली ह्यांसाठी बाजारात  चिमुकल्यांनी आणि त्यांच्या पालकांनी गर्दी केली होती.

शाळा म्हटली आपल्याला आपल्या शाळेचे ते दिवस आठवतात,ते मित्र,त्या खोड्या आता आठवल्या कि मनाला सुखावून जातात. आधी शाळेत पाठू नको म्हणून आईकडे रडायचो आता मात्र नुसत्या शाळेच्या आठवणीने डोळे ओले होतात.तो नव्या कोर्या वही,पुस्तकांचा सुवास,ती काळी पाटी,वहीच्या कोपर्यात ठेवलेला मोरपीस सगळ कस पुन्हा परत मिळव अस वाटत,आणि आपणही पुन्हा त्या शाळेच्या रम्य मैफिलीत रममाण व्हावस वाटत.

पहिली पासून सुरु झालेली शाळेची लगबग,पदवीधर होईपर्यंत चालत राहते,आजही शाळेत जाणार्या त्या चिमुकल्यांना बघून आपल्या लहानपणीच्या निरागसतेची अनुभूती नक्कीच होते. शाळेचा पहिला दिवस जणू आयुशाच नवीन वळणच असत अस म्हटल तरी वावग ठरणार नाही.म्हणून मला पुन्हा जाऊन बसावस वाटत त्या शाळेच्या मागच्या बाकावर ,आणि आपल्या गतकाळाच्या  आठवणींना पुन्हा उजाळा द्यावासा वाटतो.