शाळा सोडताना

shalaफार झाल गुरुजी आता खूप काही सहन केले

नाका तोंडच पाणी पार डोक्यावर गेल

आता दारुड्या बापाशी रोजच झगडाव लागत आहे

शाळा सोडताना गुरुजी पत्र शेवटच लिहित आहे ||

 

उघड्या नागड्या तुकड्यावरती ताव मारणारे भरपूर आहेत

दु;खाणे होरपळणारया काळजावरती  घाव घालणारेही

भरपूर आहेत |

तुकड्यावरचा ताव आणि काळजावरचा घाव

मला असच जगाव म्हणून भाग पाडत आहे

शाळा शोडताना गुरुजी पत्र शेवटच ………………………….||१||

 

घाई घाईत  शाळेत याव तर भुक्या पोटात कळ लागते

दुपारी घरी जाताना उन्हाची जळ लागते

पोटाची कळ आणि उन्हाची जळ खाऊन

बेतलेल्या परिस्थितीशी लडत आहे

शाळा शोडताना गुरुजी ………………………………….||२||

 

गरिबी हटावो,बेकारी हटावो निव्वळ कल्पना आहेत

वास्तव तर इथे वेगळच दिसत आहे

स्लमडॉग मिलोनियार फक्त चित्रपटामध्ये होतो.

झोपडपट्टीतला  जमाल दारूच्या नशेतच लोळत आहे

कल्पना पाहून वास्तव पचवून जीवाची धन

टिकवून ठेवेत आहे

शाळा शोडताना गुरुजी …………………………||३||

 

समता,बंधुता टाकता फक्त कागदावरतीच,कारण

चवताळलेल्या नजरा अजून काही बदलल्या नाहीत

नाचणारीच्या मुजारयाला,पुढारयाच्या सदऱ्याला

चुरगळनारया गजरयाचा तो अर्थ अजून कळला नाही

जिताडा जाळून खाक झाला जीव मात्र तडफडत आहे

शाळा सोडताना गुरुजी पत्र शेवटच लिहित आहे ||४||

 

शेवटी टाकाच

पैशे नको मला मी ते कमावणार आहे

सहानुभूती नको मला मी आत्मविश्वास मिळवणार आहे.

उद्याचा भरवसा नसला तरी चालेल

मी आज रात्री क्रांतीच स्वप्न नक्की पाहणार आहे||५|| .

 

– संजय हुकूमचंद खैरणार

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *