शाही पनीर

साहित्य :-shahi paneer

१)      दोनशे ग्रॅम पनीर , एक टी. स्पून क्रीम

२)     २ ते ३ मोठे टोमाटो बारीक चिरलेले किंवा एक वाटी टोमाटो प्युरी

३)     एक कांदा बारीक चिरलेला

४)     एक टेबल स्पून आले-लसूण पेस्ट

५)    एक टेबल स्पून टोमाटो केचप

६)      धने-जिरे पावडर , हळद

७)    लाल तिखट , गरम मसाला

८)     साखर , कसूरी मेथी , मीठ

९)      एक टेबल स्पून तूप , तमालपत्र

१०)  मोठी वेलची , बदियान

११)   दोन ते चार थेंब ऑरेंज कलर . 

कृती :-

१)      पनीर घट्ट असेल तर ते पाच ते दहा मिनिटे पाण्यात टाकून उकळून घ्यावे .  म्हणजे पनीर नरम होते . 

२)     तुपात वेलची , तमालपत्र व बदियान (चक्रीफुल) फोडणी करून कांदा साधारण ब्राऊन कलर येईपर्यंत परतावा . 

३)     नंतर आले-लसूण पेस्ट टाकून परतावे .  टोमाटो बारीक चिरून ते कांदयात टाकून  परतावे .  कांदा , टोमाटो एकजीव झाला पाहिजे . 

४)     पाव चमचा हळद , अर्धा चमचा तिखट , पाव चमचा गरम मसाला , अर्धा चमचा   धने-जिरे पावडर टाकून किंचित साखर व चवीला मीठ टाकावे .  थोडे पाणी टाकून  जाडसर रस्सा करावा . 

५)    पनीरचे तुकडे करून त्यांना दोन ते चार ऑरेंज कलर लावून ठेवावा .  रस्सा चांगला उकळला की त्यात एक टेबल स्पून टोमाटो केचप टाकावा . 

६)      क्रीम घोटून टाकावे .  अर्धा चमचा कसूरी मेथी पावडर करून टाकावी .  पनीरचे तुकडे टाकून दोन ते चार मिनिटे शिजवावे .  कोथिंबीर चिरून टाकावी .

७)    गैसवर एक लहान कोळशाचा तुकडा चांगला लाल करावा .  पनीरच्या भांडयात एक  लहान वाटी ठेवावी . 

८)     चांगला लाल झालेला कोळसा त्या वाटीत ठेवून त्यावर एक-दोन चमचे तूप सोडावे .  पनीरच्या भांडयावर लगेच झाकण ठेवावे . 

९)      तुपाचा धूर होईल आणि तो छान वास पनीरला लागेल .  पाच मिनिटांनंतर झाकण काढून कोळशाची वाटी काढून घेऊन परत झाकण ठेवणे .