शिक्षक दिन ..!

ts
‘ज्ञान मंदिरा,सत्यं शिवं सुंदरा ‘ह्या भावगीताच्या ओळी,आपल्याला आपल्या शाळेच्या आठवणी दाखवीत असतात.शाळा म्हणजे आपल्या आयुष्यातील गोड आठवणी पैकी एक गोड आठवण आणि अविस्मरणीय अनुभव.
५ सप्टेबर म्हणजे शिक्षक दिन.या दिवशी शिक्षकांना आराम असतो कारण हा दिवस विद्यार्थी शिक्षकांचा असतो.वर्षभर जे विद्यार्थी आपल्या शिक्षकांचं ऐकत असतात.ह्या दिवशी मात्र शिक्षकांचं काही एक चालत नाही.
विद्यार्थी शिक्षक बनून इतर विद्यार्थ्यांना शिकवतात.मुळात हा जो काही आनंद असतो हा मुलांसाठी आणि त्यांच्या शिक्षकांसाठी एक चैतन्यदायी स्वरूपाचा असतो.कारण गुरु आणि शिष्या मध्ये असलेला सामंज्यस्यपणा आणि शिक्षणाचा घेतलेला वसा हा नेहमी प्रेरणादायी असतो.
क्रांतीबा ज्योतिबा फुले यांनी रोवलेली शिक्षणाची पाळें-मुळे आज विशाल वटवृक्षात फोफावली आहेत,क्रांतीज्योती सावित्रीबाईनी घेतलेलं समाज शिक्षणाचं व्रत आज सार्थ झालेलं दिसत आहे.म्हणून शिक्षणाचा अधिकार आणि जागृती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचविणाऱ्या ह्या दाम्पत्यांना आणि तमाम शिक्षण सुधारकांना साष्टांग दंडवत..!