शिवराज्याभिषेक सोहळा

rajyabhishek
स्वराज्याची  स्थापना करून सर्वसामान्य रयतेच राज्य निर्माण करणाऱ्या नृपश्रेष्ठ छत्रपति शिवरायांचा ३४० वा. शिवराज्याभिषेक सोहळा,स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर लाखो शिव प्रेमींच्या,आणि युवराज छत्रपति संभाजी महाराजांच्या उपस्थितीत पार पडला. 
रायगडावर शिव भक्क्तांची अभूतपूर्व हजेरी पाहायला मिळाली. 
ह्यावेळी युवराज छत्रपति संभाजी महाराजांनी लाखो शिव प्रेमींच्या बरोबरीने किल्ले रायगड पायी सर केला. 
शिवराज्यभिषेक सोहळ्यात अनेक कार्यक्रम साजरे झाले,महाराजांची राजधानी “जय जिजाऊ,जय शिवराय “च्या निनादाने दुमदुमून उठली,
 अखंड  विश्वाने आपल्या हृदयस्थानी ठेवलेल्या “हृदय सम्राट “छ. शिवरायांचा शिवराज्यभिषेक सोहळा डोळ्यांची पारणे फेडणारा होता. 
शिव स्मारक बरोबर,गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न जलद गतीने करावा असे आव्हान युवराज संभाजी महाराजांनि केले. 
मात्र उठसुठ फालतु गोष्टीचं live coverage दाखवणारा इलेक्ट्रोनिक मिडिया शिवराज्यभिषेक सोहळ्यात कुठेच आढळला नाही ह्याची मोठी खंत आणी रागीट प्रतिक्रिया  शिवप्रेमींनी व्यक्त केली.