शीर्षासन

shirshasanजर आपण योगासनांमध्ये शीर्षासन करत असाल तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल.. अनेक आजारांपासून शीर्षासन तुम्हाला दूर ठेवते. डोकं खाली आणि पाय वर करण्याला शीर्षासन म्हणतात. यात हातांच्या आधारे विविध कोनांमध्ये शरीराला उलटे केले जाऊ शकते. पूर्ण शरीराचे संतुलन डोक्याच्या आणि हातांच्या भरवशावर असते. शीर्षासनामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. डोक्यातील रक्तप्रवाह वाढल्याने मेंदू सक्रीय होतो. ग्रंथींची कार्यप्रणाली दुरुस्त होते. पोटाजवळील अंग जसे लिव्हर, किडनी, आतडे अँक्टिव्ह होतात आणि पचनक्रिया चांगली राहते. ईसाचे प्रसिद्ध ग्रीक फिजिशियन हिप्पोक्रेट्स रुग्णांवर उपचार करण्यासाठी दोर्‍यांनी त्यांना उलटे लटकवायचे. परदेशामध्ये इन्वर्जन थेरपीच्या नावाने ज्यांना ओळखले जाते ज्यात फ्लेक्सिबल बेडसारख्या टेबलवर हे आसन केले जाते. पायांना ग्रीपमध्ये बांधण्यासाठी शरीराला उलटे लटकवले जाते. यात शरीराचा संपूर्ण भार डोक्यावर आणि हातांवर येतो आणि फ्लेक्सिबल टेबल असल्याने दुखापतीची भीती नसते. डिप्रेशनने ग्रस्त असलेल्या लोकांना याचा फायदा मिळतो.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *