शुभ दसरा
|आजचा दिवस हिंदू संस्कृतीत फार महत्वाचा आहे . साडेतीन मुहूर्तांपैकी एक हा शुभ मुहर्त आहे . याच दिवशी पार्वती मातेने अष्टभुजा रूप धारण करून दुर्गासूराचा नाश केला आणि त्या रूपाला `विजया’ असे नांव दिले. हिंदुधर्मातील कथे नुसार याच दिवशी रामाने रावणाचा वध केला होता आणि अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी हे नाव पडलं.म्हणून सर्वत्र दसरा साजरा करतात. आपल्या जीवनात आपण सुद्धा दुर्जनांचा त्याग करून सदगुण आत्मसात केले पाहिजे . नवीन तंत्रज्ञाच्या जगात आपली संस्कृती आपल्याला खूप काही शिकवून जाते हे विसरता कामा नये .
नव्या प्रारंभासाठी- सोन्यासारख्या दिवसाच्या – सोन्याहुन पिवळ्या शुभेच्छा!
आमच्या संपूर्ण टीम कडून आपण सर्वाना दसर्याच्या खूप खूप शुभेच्छा !!!