शेपूची भाजी
|साहित्य :-
१) एक जुडी शेपू
२) मध्यम आकाराचे कांदे दोन
३) लसूण चार-पाच पाकळ्या
४) तेल दोन-तीन चमचे
५) फोडणीचं साहित्य
६) तीन-चार हिरव्या मिरच्या
७) चवीपुरतं मीठ .
कृती :-
१) भाजी धुवून चिरून घ्यावी . कांदे उभे बारीक काप करून घ्यावेत . हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घ्यावेत .
२) लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्याव्यात . पसरट पातेल्यात किंवा कढाईत फोडणी करून त्यात कांदा , मिरची परतून घ्यावी .
३) नंतर त्यात चिरलेली भाजी घालून मीठ टाकून तीन-चार मिनिटं शिजवून घ्यावी .
४) कांदा परतत असतानाच त्यात ठेचलेला लसूण टाकावा . ही भाजी अतिशय खमंग लागते .
५) ही भाजी मुगाची डाळ घालूनही करतात किंवा मेथीचं अळण करतात , त्याप्रमाणे शेपूचंही अळण करतात .