शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी

dscn4725edited

(शेवग्याचं झाड घरी असेल तरच कोवळा पाला मिळतो .  बाजारात शेवग्याची पानं भाजी म्हणून विकत मिळत नाहीत .)

साहित्य :-

१)      शेवग्याचा कोवळा पाला (साधारण एक जुडी होईल एवढा)

२)     लसणाच्या पाकळ्या चार-पाच

३)     जिरं अर्धा चमचा

४)     हिरव्या मिरच्या तीन-चार

५)    मुगाची डाळ अर्धी वाटी

६)      तेल , फोडणीचं साहित्य

७)    चवीपुरतं मीठ .

कृती :-

१)      मुग डाळ एक तास आधी धुवून भिजत ठेवावी व नंतर निथळून घ्यावी .

२)     शेवग्याची पानं धुवून चिरून घ्यावी .  लसूण हिरव्या मिरच्या , जिरं वाटून  घ्यावं . फोडणी करून त्यात वरील वाटण घालावं .

३)     ते खमंग परतल्यावर त्यात डाळ घालावी व डाळ जराशी परतल्यावर त्यात चिरलेली भाजी घालावी .  मीठ घालून झाकण ठेवून मोकळी शिजू दयावी .

४)     शेवग्याचा पाला काहीसा तुरट-कडवट चवीचा असतो .  पण भाजी केल्यावर चांगली लागते .  याच्या फुलांची दही घालून कोशिंबीर करतात .