शेवग्याच्या पानांची भाजी

shevga2

साहित्य :-

१)      शेवग्याची पानं दोन वाटया

२)     कांदा

३)     डाळीचं पीठ अर्धी वाटी

४)     तिखट , मीठ

५)    गुळ , खोबरं .

कृती :-

१)      शेवग्याची पानं आतल्या शिरा वगैरे काढून बारीक पानं तेवढी घ्यावीत .  पानं  कोवळी असावीत .

२)     फोडणीत कांदा चांगला परतून त्यावर शेवग्याचा पाला चुरून टाकावा .

३)     पाण्याचे हबके मारावेत .  त्यात मीठ , तिखट , गुळ घालून थोडा रस सुटू  दयावा .

४)     पानं अर्धवट शिजली की वरून थोडं थोडं डाळीचं पीठ वा भाजणी घालून मंद आचेवर परतावं .

५)    कोरडी वाटल्यास पुन्हा पाण्याचा हबका मारावा .  आवडत असल्यास दोन चमचे चिंचेचं पाणी मारावं .

६)      कोथिंबीर , खोबरं घालून पुन्हा भाजी परतावी .  कडेनं दोन-तीन चमचे तेल सोडावं .

७)    निवल्यावर भाजी मोकळी होईल .  अशीच शेवग्याच्या फुलांचीही ‘भगरा भाजी’ होते .