शेवग्याच्या फुलांची भाजी

shevgaसाहित्य :-

१)      शेवग्याची ताजी फुलं दोन वाटया

२)     मुग डाळ पाव वाटी

३)     कांदा एक मोठा

४)     तेल , फोडणीचं साहित्य

५)    मीठ , गुळ , तिखट .

कृती :-

१)      शेवग्याची फुलं स्वच्छ धुवून ती बारीक चिरावीत .

२)     फोडणीत भिजवलेली मुग डाळ , बारीक चिरलेला कांदा चांगला परतून त्यावर फुलं टाकून परतावीत .

३)     शिजत आली की मीठ , गुळ , तिखट , खोबरं घालून तीन-चार वाफा   आणाव्यात .

४)     कांदा आवडीनुसार घालावा .