शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी
|साहित्य :-
१) शेवग्याच्या शेंगा एक-दोन
२) भाजणी वा भगरा पीठ दीड वाटी
३) गुळ , चिंच
४) तिखट दोन-तीन चमचे
५) एक ते दीड चमचा गोड मसाला
६) धन्या-जिऱ्याची पूड
७) खोबरं .
कृती :-
१) शेंगांचे बेताचे तुकडे करून पाण्यात टाकावेत . तेलाच्या हिंग मोहरीच्या फोडणीवर परतून घ्यावेत .
२) वाटीभर पाणी घालावं . त्यात थोडं मीठ व तिखट टाकावं .
३) एका पातेलीत भाजणी वा भगरा पीठ घेऊन त्यात थोडं मीठ , गुळ , चिंचेचा कोळ , तिखट , मसाला , धने-जिरे पूड सर्व घालून सरसरीत कालवावं .
४) शेंगा मऊसर झाल्या की हे पीठ त्यावर ओतून उलथन्यानं परतून चंगल्या वाफा आणाव्यात .
५) ओलं खोबरं , कोथिंबीर पेरून पुन्हा परतावी व झाकण ठेवावं . ( ही भाजी परतण्यासाठी डाव किंवा चमचा घेऊ नये . उलथनं घ्यावं म्हणजे नीट परतता येतं . भाजी मंद आचेवर परतावी .)