शेवयांचा उपमा

semiya upma

 

 

 

 

 

 

साहित्य :-

१)      दीड कप शेवया (शक्यतो जाड)

२)     एक कांदा बारीक चिरून

३)     एक टोमाटो बारीक चिरून

४)     चार कप पाणी , भोपळी मिरची

५)    श्रावणघेवडा आणि गाजर (बारीक चिरून)

६)      मटार – प्रत्येकी पाव वाटी

७)    दोन मिरच्या लांब तुकडे करून

८)     अर्धा चमचा किसलेलं आलं

९)      दहा-बारा कढीलिंबाची पानं

१०)  एक चमचा लिंबूरस

११)   साखर , दोन मोठे चमचे तेल

१२)  मोहरी , हिंग , जिरं

१३)  ओलं खोबरं , कोथिंबीर

१४) चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      प्रथम चार कप पाणी उकळायला ठेवावं .  त्यात चिमुटभर मीठ घालावं .

२)     पाणी खळखळून उकळलं की शेवया टाकव्या .  शेवया शिजल्या की चाळणीतून पाणी काढून निथळून घ्याव्यात .

३)     कढाईत तेल घालावं .  त्यात मोहरी , जिरं , कढीपत्ता , आलं-मिरच्या घालून थोडं परतल्यावर त्यात प्रथम कांदा घालावा .

४)     कांदा पारदर्शी झाल्यावर श्रावण घेवडा , गाजर आणि मटार (प्रथम या भाज्या थोडया वाफवून घ्याव्यात) टाकाव्यात .

५)    नंतर भोपळी मिरची घालावी .  शेवटी शेवया घालाव्यात .  मीठ , साखर , लिंबूरस घालून हातानं ढवळावं .

६)      गैस मंद करून झाकण ठेवून एक वाफ दयावी .  लगेच बंद करावं .  वरून खोबरं आणि कोथिंबीर पेरावी .