श्रावणात घन निळा बरसला

shravan

यंदाच्या मान्सून उशिरा आला त्यामुळे बहूतेक ठिकाणी पिकांची दुबार पेरणी झाली.पण उशिरा का असेना पाऊस बरसला.. तोही इतक्या प्रमाणात कि आता ओला दुष्काळ जाणवायला लागला आहे.मात्र मराठवाडा अजूनही कोरडाचं आहे.मात्र इतरत्र पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे.सर्वत्र हिरवळीचा देखावा जणू सजला आहे.त्यामुळे पर्यटनाच्या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली आहे.
माळशेज,महाबळेश्वर,इगतपुरी,कोंकण अशा कितीतरी ठिकाणी निसर्गाचा आस्वाद घेणारी मंडळी दिसते.हिरवेगार बहरलेली शेते,अंगाला झोंबणारा गार वारा,चोहीकडे वेढलेले धुके,पावसाची रिमझिम मनाला अल्हाद देणारी आहे.
श्रावण महिना म्हटला कि अतिशय धार्मिक कार्यांचा,सर्वाधिक सण असलेला,हिरवळींनी नटलेला पवित्र महिना असतो ज्याची सर्वच आतुरतेने वात बघत असतात.त्यामुळे आपण जर निसर्गप्रेमी असाल आणि आपल्याला जर का पर्यटनाची आवड असेल तर बिंदास भर पावसात घराबाहेर पडा आणि मिळवा आनंद निसर्गाच्या अदभूत सौंदर्याचा.त्यासाठी कुठल्या पर्यटन स्थळी जाण्याची गरज नाही आपल्याच परिसरात तो आनंद आपण अनुभऊ शकतो.कारण श्रावणात घन निळा सर्वत्रच बरसतोय .

]

One Comment