संशयी प्रियकराला फाशीची शिक्षा….!
|संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या नागपूरच्या धनश्री रामटेके खून खटल्यातील दोघा आरोपींना न्यायालयाने आज शिक्षा ठोठावली. झी चोवीस तास ने दिलेल्या बातमीनुसार गेल्या १४/८/२०१२ रोजी धनश्रीची तिच्याच प्रियकर धर्मवीर श्रीराम चव्हाण याने त्याचा मित्र पंकज उर्फ सोनू उर्फ चेरी सदाशिव राऊतकरच्या साथीने निघृण हत्या केली होती.
सविस्तर वृत्त येथे वाचा….
धर्मवीर चव्हाणला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली असून त्याला मदत करणारा त्याचा मित्र पंकज राऊतकरला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. धनश्रीचे त्याच्याव्यतिरिक्त अन्य व्यक्तीसोबतदेखील संबंध आहेत अशा संशयावरून तिचा प्रियकर धर्मवीरने मित्राच्या साथीने तिचा खून केला होता. धर्मवीरने धनश्रीला नायलॉनच्या ओढणीने गळा दाबून संपविल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने ह्या दोघा नराधमांनी रबरी टायरने तिचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्नदेखील केला होता. तिचा संपूर्ण मृतदेह जाळू कोळसा झाला होता, मात्र डावा पाय गुडघ्यापासून शाबूत होता. पायाच्या बोटांवरील नेलपॉलिश, आणि घटनास्थळावर सापडलेल्या तिच्या सँडलमुळे ओळख पटू शकली होती.
धर्मवीरला दिलेल्या शिक्षेमुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत असून त्याची फाशी कायम रहावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. धर्मवीरला लवकरात लवकर फाशी देऊन धनश्रीला न्याय द्यावा अशी भावना व्यक्त होत आहे.