संशय

doubtकाळजी, चिंता ही मनाच्या नकारात्मक स्थितीची उदाहरणे आहेत. त्याचीच पुढची पायरी म्हणजे संशय. संशयी स्थिती आशावादाची हत्या करते. आशावादी व्यक्तीच खर्‍या अर्थाने व्यवहारी आणि सत्यवादी असतात. पण संशयाच्या जाळ्यात अडकून माणूस हिंमत गमावतो. नकारात्मक विचार जीवनात प्रवेश करतात; मात्र आशावाद माणसाला चैतन्य देतो. प्रसन्नता देतो. असा माणूस आपल्या वागण्याने आजूबाजूच्या वातावरणात प्रसन्नता आणतो. तो कधीही चिंताग्रस्त दिसत नाही. याउलट संशयित माणूस सतत चिंतेने ग्रासलेला असतो आणि स्वत:ची उपेक्षा करतो. व्यवहारात आपण अनेक व्यक्तींवर विश्‍वास टाकत असतो. साधे बसने अथवा रिक्षाने प्रवास करत असताना त्या वाहनाचा चालक आपल्याला योग्य स्थळी नेणार आहे याचा विश्‍वास बाळगतो. हा विश्‍वासच प्रत्येक गोष्टीला सकारात्मक वळण देण्याच्या कामी येतो.