सचिनसोबत त्याची ‘१०’ नंबरची जर्सीही निवृत्त….

   sachin    मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि तो वापरत असलेली ‘१०’ नंबरची जर्सी नेहमीच कुतूहलाचा विषय ठरली आहे. इतर देशांच्या क्रिकेटपटूमधील सचिनचे चाहतेही ‘१०’ नंबरच्या जर्सीसाठी आग्रह धरत असतात. आता सचिनने टी-२० आणि कसोटी क्रिकेटप्रकरातून निवृत्तीची घोषणा केलेली आहे. ह्या महान खेळाडूच्या सन्मानार्थ सचिन टी-२० खेळत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाच्या संघ व्यवस्थापनाने ‘१०’ नंबरची जर्सीही निवृत्त केली आहे. यापुढे मुंबई इंडियन्स संघातील इतर कुठल्याही खेळाडूला कधीही ‘१०’ नंबरची जर्सी वापरता येणार नाही.

     सचिनच्या निवृत्तीनंतर ‘१०’ नंबरची जर्सी मिळविण्यासाठी चाधोध लागलेले खेळाडू ह्या निर्णयामुळे नक्कीच निराश झालेले असणार. हा निर्णय मुंबई इंडियन्स संघाच्या मालक नीता अंबानी यांनी स्वतः जाहीर केला. महान खेळाडू सचिन तेंडूलकरच्या सन्मानार्थ मुंबई इंडियन्स संघाने घेतलेल्या ह्या निर्णयाचे स्वागत करतांना सचिनच्या चाहत्यांनी भारताच्या एकदिवसीय राष्ट्रीय संघातूनही ‘१०’ नंबरची जर्सी निवृत्त करण्याची अपेक्षा व्यक्त केली.      

2 Comments