सत्ता पुढाऱ्यांची
|बदलतच आहे
अन राज्य म्हणे येथे
जनतेचेच आहे.
देशोधाडीच्याही टोकाला पोहचलाय राजकारण
झोपलाच आहे येथे सत्याचा कुंभकरण
करतात पैसे दावून मताचे हे भरण
यात होतय गरीबाचेच मरण
सगळे कसे वाटोळे सत्तेचेच आहे …………अन राज्य
मुलीला आज कुणी स्वीकारत नाही
अन जीवनाच्या संगतीला बायको मात्र राही
चिरडून टाकतो त्या चिमुकलीला जेव्हा
कुणी कस पेटून उठतच नाही
उजाड कूस ममतेची स्त्री अब्रूही वेशीला तागलीच आहे ……….. अन ……..
गॅस,बाजारभाव मध्ये झाली अचाट भाववाढ
कडाकटरहि म्हणतो एक एक रुपया जास्तीच भाडकाढ
विरोधी पक्षनेते खाजवून घेता आहेत आपलीच दाढ
वाटतय राजकारणाला लागलीच झोप गाढ
अजुनही रस्त्याचे खड्डे,टोलनाके जीव घेतेच आहे …अन
आदर्श,टूजी सिंचन घोटाळेच घोटाळे
केलेले भ्रष्टाच्या सर्पाने वेटोळे
जीभिवरती रेगळत आहेत पैशांचे लाळे
अन कोळ्शातही हात काळेच काळे
दुष्काळात शेतकरी आत्मदान देतोच आहे ………
घाम गाळुनी बचत करी पैशाची
गुणवत्ता मिळे आस वाढती शिकायची
अहो कस धरतेय मी येथे यशाची
अन नोकरीसाठी म्हणतात सोय करा आमच्या चहा पाण्याची
असे वाटते चहा ऐवजी यांना कडुलिंबाचेच रस दयावे …………अन
चालापोळ येथे गुंड्याचेच राज
चढलाय त्यांना भलताच माज
बॉम्बस्पोटातही गरीबच भाज
या आगीतून अहो मंत्रालाही सुटलेच नाही …………….अन
शत्रूने देशात प्रवेश केला
नाही ठाऊक कुणास तो कसा आला
राजकारणी निघतो त्याच्याच चेला
किती उशिरा दिली फासी त्या कशाबला
आठवा बलिदान त्या पोलिसांचे
अजुनही अंगावर काटे २३/११ च्या हल्लाचेच आहे ………..अन
सिर्फ हंगामा खडा करणा मेरा
मकसद नही मेरी ये कोशिश हे कि
ये सुरत बदलनी चाहिये
मेरे सिनेमे हे आग तुम्हारे
जिनेमेभी जलनी चाहिये
आणि म्हणूनच म्हणते ………………………………
सर्वच नसतात त्याच्यासारखी
सोनारातही असतात खरे रत्नपारखी
आजचा तरुणच या देशाला गुराखी
मजबूत आहे त्याच्या ध्येयाच्या पाखी
तो याविरुद्ध लढा देणारेच आहे
या देशाला महासत्ता बनवणारच आहे ……..
मग मी आरती म्हणेल तेव्हा राज्य जनतेचे आहे
तेव्हा राज्य फक्त तुमचेच आहे
सत्ता पुढाऱ्यांची,ते करतात दैने बाहे
अन राज्य म्हणे येथे जनतेचेच आहे
सत्ता पुढाऱ्यांची,ते करतात दैने बाहे
सत्ता पुढाऱ्यांची,ते करतात दैने बाहे
अन राज्य म्हणे येथे जनतेचेच आहे .