सत्यमेव जयते

5B8_Aamir-Khan-In-Satyamev-Jayate-अमीर खानचा सत्यमेव जयते हा reality show सध्या बहुचर्चित आहे,ह्याच कारण त्यामध्ये असलेली भीषण सामाजिक वास्तवता, महासत्ता होऊ घातलेल्या भारत देशामधील एकूण परिस्थितीचा बोलका आढावा म्हणजे सत्यमेव जयते. ‘जिन्हे देश कि फ़िक्र’,हे ह्या या नारयाने संपुर्ण भारतीयांची मने काबीज करण्यात आमिरला यश आल आहे. दिल पे लगेगी तभी बात बनेगी असं म्हणत तळागाळातील अनेक समस्यांना लोकांपर्यंत पोहोचवून आपण भारतीय आहोत आणि आपली नैतिक जबाबदारी विसरून चालणार नाही असा मोलाचा संदेश आपल्याला ह्यातून मिळतो. आमिरच व्यक्तिमत्व तसं ईतर कलाकारांपेक्षा भिन्न स्वरूपाच आहे,त्याचे चित्रपट जर आपण पाहिले तर social touch असणारे असतात. त्यात सरफरोश,मंगल पांडे,लगान,रंग दे बसंती ह्यांसाख्या सिनेमात आमिरची देशभक्ती आपल्याला पाहायला मिळते . तसेच अतिथी देवो भव ह्या भारतीय पर्यटनाच्या जाहिरातीत देखील आमिरची वेगळी छटा बघायला मिळते. सत्यमेव जयते ह्या show मधून सामाजिक जनजागृती व्हावी आणि प्रत्येकाने आपले मौलिक अधिकार ओळखावे हा त्यामागचा हेतू असल्याचं आमिरने स्पष्ट केलं आहे. सदर showच हे दुसर पर्व असून मार्च महिन्याच्या प्रत्येक रविवारी सकाळी ११ वा. हा show दाखविला जाणार आहे.

7 Comments