सफरचंदाचे फायदे…

images इंग्रजीत एक सुप्रसिद्ध म्हण आहे, ‘An Apple keeps doctor away’ अर्थात ‘रोज एक सफरचंद खाल्ल्यास डॉक्टरला दूर ठेवता येते’ आणि हे खरेही आहे. हे कित्येकांना ठावूक असले तरीही सफरचंद खाण्याचे नेमके फायदे आणि त्यातील गुण खालीलप्रमाणे,
१) एनिमिया पासून बचाव :- सफरचंद मध्ये मोठ्या प्रमाणात ‘लोह’ असल्याने एनिमिया सारख्या आजारावर ते रामबन इलाज ठरले आहे. रोज २-३ सफरचंदे खाल्ल्यास शरीराची संपूर्ण दिवसाची लोहाची गरज पूर्ण होते.
२) कॅन्सर चा धोका कमी होतो :- सफरचंदमधील क्वरसिटीन पेशींना होणाऱ्या नुकसानापासून वचविते. त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.
३) मधुमेहापासून बचाव  :- सफरचंदमधील ‘पेक्टिन’ जे शरीरातील ग्लाक्ट्रॉनिक आम्लाची ची गरज पूर्ण करते आणि इन्सुलिनचा वापर करणेही कमी करते.
४) पचनक्रियेस मदत करते :- सफरचंदमध्ये मोठ्या प्रमाणात ‘फायबर’ असते जे पचनशक्ती वाढण्यास मदत करते. सफरचंद जर त्याच्या सालीसह खाल्ले तर त्यामुळे कफहि बरे होतात.
५) कोलेस्ट्रॉल :-  सफरचंद मध्ये विरघळू शकणारे फायबर असते जे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करते.
६) वजनावर नियंत्रित ठेवते :- स्वास्थविषयक बर्याच तक्रारी वाढलेले वजन आणि स्थूलपणामुळे संभवतात, जसे हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह. सफरचंदमध्ये आढळणारे फायबर वजन कमी करण्यास मदत करते.
७) रोगप्रतिकारक शक्ती वाढविते :- लाल सफरचंदातील क्वरसीटीन नामक एन्टीऑक्सिडेंट असते. नुकत्याच लागलेल्या संशोधनानुसार क्वरसीटीन रोगप्रतिकारक क्षमता चांगली राखण्यास मदत करते.
८) लिव्हर मजबूत करते :- आपण रोजच्या जीवनात थोडेतरी विषयुक्त पदार्थ खातो. खाल्लेल्या अन्नातील विष नाहीसे करण्याचे काम लिव्हर म्हणजेच यकृत करत असते. आणि ह्याच लिव्हरला मजबूत करण्यासाठी रोज एक सफरचंद खाल्ले पाहिजे कारण त्यात मोठ्या प्रमाणात एन्टीऑक्सिडेंट असतात.
९) दात निरोगी ठेवते:- सफरचंद मध्ये फायबर असल्याने दात चांगले राहतात. यात एन्टीव्हायरल प्रॉपर्टीज असतात ज्या किटाणू आणि विषाणूपासून दूर ठेवतात. तसेच तोंडातील लाळेचे प्रमाणही वाढवितात.

9 Comments