समानतेचा अधिकार

samanataसमाजात हीन समजल्या जाणाऱ्या आणी चेष्टेचा विषय बनलेल्या तृतीय पंथ्यांना

अखेर माणुस म्हणुन जगण्याचा समानतेचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने काल दिला.
ट्रान्सजेन्डर म्हणजे तृतीय पंथ्यांना तीसरा वर्ग म्हणून स्वतंत्र कायदेशीर ओळख मिळणार आहे.
समाजात नेहमी हिणवल्या जाणाऱ्या ह्या तिसऱ्या वर्गाला मतदान ओळख पत्र,पासपोर्ट,परवाना,तसेच इतर सोयीसुविधा देण्यात याव्या
ज्या इतर घटकांना दिल्या जातात,तसेच आरोग्य सेवा,शिक्षण,नोकऱ्या ह्यांमध्ये देखील तृतीय पंथ्यांना स्थान देण्यात यावं असा निर्देश सर्वोच्य न्यायालयाने दिला आहे.
राष्ट्रीय विविध सेवा प्राधिकरण ने दाखल केलेल्या याचिकेवर हा ऐतिहासिक निर्णय देण्यात आला आहे.
तृतीय पंथ्यांची समाजात तिसरे लिंग म्हणून स्वतंत्र ओळख असावी.
ह्या मागणीचा पाठपुरावा करणाऱ्या लक्ष्मी त्रिपाठी ह्यांनी ह्या आदेशाच स्वागत केलं  आहे.
त्यामुळे देशातील लाखो तृतीय पंथ्यांना याचा फायदा होणारा आहे,
शिवाय समाजाच्या चवताळलेल्या नजरा आता खाली झुकणार आहेत.
One Comment