साक्षीदारांचे जबाब गहाळ

download (1)
अभिनेता सलमान खान याच्या विरोधातील “हिट ऍण्ड रन‘ खटल्यातील साक्षीदारांचे जबाब गहाळ झाले असतानाच आता पोलिसांनी याबाबतची केस डायरीही हरवली आहे. यामुळे आधीच विलंब झालेल्या या खटल्याला आणखी उशीर होण्याची शक्‍यता आहे.
लिसांनी या प्रकरणातील महत्त्वाच्या नोंदी केलेली केस डायरी आता पोलिसांना सापडत नाही, अशी माहिती न्यायालयात गुरुवारी अभियोग पक्षाने दिली. यापूर्वी साक्षीदारांच्या 63 कागदपत्रांपैकी फक्त सात कागदपत्रे मिळाली आहेत, अन्य कागदपत्रे गहाळ झाली आहेत, असे न्यायालयाला सांगण्यात आले होते. त्यामुळे आता अभियोग पक्षाची पुढील कारवाई काय असेल, याविषयीची माहिती 12 सप्टेंबरला देण्याचे आदेश न्यायालयाने अभियोग पक्षाला दिले आहेत. पोलिसांकडे मूळ कागदपत्रे नसली, तरी त्याच्या सत्यप्रती आहेत, या प्रतींच्या मदतीने खटला चालू शकतो का, याची तपासणीही न्यायालय करणार आहे.