साधा-सोपा केक

साहित्य :-cake2

१)      दोन वाटया मैदा

२)     एक चमचा बेकिंग पावडर

३)     पाऊण वाटी लोणी

४)     एक वाटी पिठीसाखर

५)    तीन अंडी , दुध

६)      एक चमचा vhanila इन्सेस

७)    अर्धी वाटी टूटी फ्रुटी (ऐच्छिक)

८)     चिमुटभर मीठ . 

कृती :-

१)      मिक्सरमध्ये अंडी , पिठीसाखर , लोणी , इन्सेस आणि मीठ घालून एकजीव होईपर्यंत फेसावं . 

२)     ते एका भांडयात काढून घ्यावं .  मैदा आणि बेकिंग पूड एकत्र करून तीन वेळा चाळावं . 

३)     हा मैदा थोडा थोडा अंड्याच्या मिश्रणात घालून डावानं घोटून एकजीव करावा . 

४)     गरजेनुसार दुध घालून मिश्रण डावानं पडेल इतकं पातळ करावं . 

५)    आठ इंच व्यासाच्या डब्याला लोण्याचा हात फिरवून मैदा भुरभुरावा . 

६)      त्यात मिश्रण ओतून एकशे ऐंशी अंश (१८०) सेंटीग्रेड तापमानाला तापवलेल्या ओव्हनमध्ये ठेवून बेक करावा . 

७)    तीस ते चाळीस मिनिटात केक तयार होतो .  याच मिश्रणात अर्धी वाटी टूटी फ्रुटी किंवा चिरलेला सुकामेवा घालूनही केक बनवता येतो .