सावधान! स्मार्ट फोन चा अतिवापर ठरू शकतो आपल्या डोळ्यांसाठी घातक…..

   smartfone  सध्या अगदी लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांमध्येच स्मार्ट फोन वापरण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. मात्र ह्याच स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे दृष्टीदोषाची समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे खबरदारी घेणे जरुरीचे आहे.

     इंग्लंडमधील आघाडीचे लेसर नेत्रचिकित्सक डॉ. डेविड अलॅम्बी यांच्या मते १९९७ साली स्मार्ट फोन बाजारात आल्या पासून नजर कमी होण्याची समस्या अनेकांना भेडसावत ऑन अशा रुग्णांच्या संख्येत तब्बल ३५% वाढ झाली आहे. नजर कमी होण्याच्या ह्या समस्येला ‘नजर मायोपिया’ असे संबोधले जाते.

     सात वर्षे वयापासूनच मुलांना स्मार्टफोन देण्यात येतो असे दिसून आले आहे. पुढील दहा वर्षांच्या काळात लहान मुले आणि नवतरुणांमध्ये मायोपियाचे प्रमाण 50 टक्क्यांनी वाढू शकते असा इशाराही अलॅम्बी यांनी दिला आहे. मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहून हा दोष उदभवत असल्याने अलॅम्बी हे त्याला स्क्रीन दृष्टिदोषअसे संबोधतात.

     मोबाईलचे वापरकर्ते आपला हँडसेट चेहऱ्यापासून केवळ 18 ते 30 सेंटिमीटर अंतरावर धरतात. या तुलनेत पुस्तक वा वर्तमानपत्र वाचताना ते लांब म्हणजे 40 सेमी अंतरावर धरले जाते, असे संशोधनात दिसून आले आहे.

ह्या समस्येपासून वाचण्यासाठी खालील दक्षता घ्यावी……

 मोबाईलचा वापर (स्क्रीन टाइम) ठरवून घ्या
 दररोज काही वेळ मोबाईल न घेता बाहेर जा
 थोडा वेळ सूर्यप्रकाशात गेल्याने दृष्टिदोष कमी होतो
 मुलांना स्मार्टफोन देताना गांभीर्याने विचार करा

तमाम देशवासियांना रक्षा-बंधानानिमित्त mmच्या टीमकडून मनःपूर्वक शुभेच्छा!