साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे
|ग्रेट साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेल्या एकूण साहित्याची यादी लांबलचक असून,
सुमारे चार पानी आहे. विविध विषयात त्यांच्या साहित्याची विभागणी करून एकूण संख्याचा चार्ट असा आहे ……….
१. कथासंग्रह :- १३
२. नाटके :- ३
३. शाहिरी पोवाडे संग्रह :- १
४. तमाशा कथानक :- १४
५. प्रवासवर्णन :- १
६. कादंबऱ्या :- ३५
७. प्रसिद्ध पोवाडे :- १०
तसेच २ मार्च १९५८ रोजी मुंबईत झालेल्या दलित साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
अण्णाभाऊच्या वैजयंता, आवडी, माकडीचा चाळ, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, अलगुज, फकिरा, या सात कादंबऱ्यावर मराठी भाषेत चित्रपट निघाले
व ते सर्वच त्याकाळी सुपरहिट ठरले. चार चित्रपटांना विविध पारितोषिके मिळाली.
अण्णाभाऊच्या साहित्यातून राजकीय क्रांती व सामाजिक परिवर्तन झाले.
सर्वहारा-सर्वाधिकार नाकारलेला माणूस जागा होवून पेटून उठला.
अण्णाभाऊचे हे सर्वच साहित्य अस्सल व मराठी भाषेतच आहे. अण्णाभाऊच्या साहित्याचे भाषांतर विविध भारतीय व परदेशी भाषात झाले.
रशियाच्या राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला.