साहित्याकडे एक दृष्टीक्षेप

sahityaएकूण जीवनशैलीला जोपासण्यासाठी साहित्याची नांदी जोपासली जायला हवी. साहित्य माणसाला विचार करायला,विरंगुळा जपायला,तसेच प्रभावी व्हायला उपयोगी पडत असत.

महाराष्ट्रात आद्य कवी मुकुंदराज पासून तर आत्ताच्या प्रेम कविंपर्यंत सर्वांनीच साहित्यात मोठी भर घातलेली दिसुन येते. नाचु कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लाऊ जगी,असं म्हणून संत साहित्याची पताका आजवर फडकत आहे. ज्ञानदेवांच्या ओव्या,तुकोबांच्या गाथा, बहिणाबाई ची गाणी,सुरेश भटांच्या गझलींनी साहित्याला नवीन आयाम दिला आहे,त्यातच विद्रोही साहित्यात,ढसाळांचा गोलपिठा,उर्मिला पवारांचं आयदान ह्या सारख्या साहित्यान वेगळा पायंडाच प्रस्थापित केला,कवी,लेखक,कादंबरीकार,ललित लेखक,नाटककार,गीतकार,ह्यांसारख्या प्रभावी भूमिकांनी साहित्य क्षेत्र उजळून निघालं आहे.
कुसुमाग्रज,वि. स. खांडेकर,विंदा करंदीकर ह्यांसारख्या दिग्गज साहितीकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळण म्हणजे मराठी साहित्याच्या  उत्तुंगतेच प्रतिक आहे.
पण हल्ली साहित्य संमेलन हे वैचारिक कमी आणि वादाची जास्त झाली आहेत. त्यामुळे नवोदित साहितीकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
आधीच वाचक वर्ग कमी होत आहे,ग्रंथांवर धूळ साचली आहे.त्यामुळे साहित्याला नव संजीवनी कशी मिळेल ह्याचा विचार व्हायला हवा. कारण साहित्य टिकलं तरच विचार टिकतील.
माझ्या मऱ्हाटीची बोलु कौतीके
परि ते अमृताहुनी पैजा जिंके