सिद्धार्थ गौतम बौद्ध

 सिद्धार्थ गौतम बौद्ध, धर्माचे संस्थापक. gautam

मी भगवंत नाही,तुमच्यासारखाच एक माणूस आहे ,असं म्हणत जगाला विश्वशांतीची शिकवण देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बौद्ध.
ह्याचं सबंध आयुशाच एक विलक्षण अनुभव आहे.  बौद्ध मतानुयायी याला वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध (संमासंबुद्ध) मानतात.
बौद्ध धर्म हा अती प्राचीन असा धर्म आहे,
त्याच्या जन्माचा व मृत्यूचा नेमका काळ निश्चितपणे सांगता येत नाही. विसाव्या शतकातल्या इतिहासकारांच्या मते, इ.स.पू. ५६३ ते इ.स. पू. ४८३ हा त्याचा जीवन काळ. अलीकडील काळातील संशोधक विद्वानांनी ठामपणे व्यक्त केलेल्या मतानुसार, बुद्धाच्या मृत्यूचा सन इसवी पूर्व ४०० च्या जवळ पास असावा. शाक्यमुनी (शाक्यांचा मुनी) -हे गौतमाचेच दुसरे नाव- हा बौद्ध धर्माचा मुख्य स्तंभ.
त्याची जीवनकहाणी, त्याची प्रवचने, आणि त्याने घालून दिलेले विहाराचे नियम पवित्र मानून अनुयायांनी त्याच्या महापारीनिर्वाणानंतर संकलित केले आणि मौखिक परंपरेने पिढ्यानपिढ्या जतन केले . गौतमबुद्धाच्या मानल्या जाणाऱ्या विविध शिकवणुक पाठांतराद्वारे एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे सुपूर्द होत गेला.त्यांच्या महापारीनिर्वानानंतर साधारण ४०० वर्षांनंतर ही शिकवणूक लेखी स्वरूपात प्रथम मांडली गेला.