सुंदर, नितळ, निरागस डोळ्यांची निगा अशी राखा..
|आपण आपले शरीर, चेहरा सुंदर दिसावा म्हणून बरीच काळजी घेतो. मात्र, तितकीच काळजी आपण डोळ्यांची घेतो का? डोळे सुंदर दिसावेत म्हणून आपण प्रयत्न करतही असू, मात्र त्याचबरोबर आपल्याला डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
त्याकरीता काही महत्वाचे उपाय खालीलप्रमाणे,
१) डोळ्यांची निरोगी वाढ व्हावी आणि ते शेवटपर्यंत चांगले, कार्यक्षम राहावे यासाठी ‘अ‘ जीवनसत्व असलेल्या हिरव्यापालेभाज्या, दूध, अंडी , मांस, मासे यांचा आहारात समावेश करावा.
२) काजळ, सुरमामध्ये समाविष्ट केलेल्या रासायनिकपदार्थांमुळे डोळ्यांना इजा होवू शकते. त्यामुळे त्याचा वापरशक्यतो टाळावा.
३) भुवया व पापण्यांना आकार देण्यासाठी पेन्सिलीचा वापर केला जातो. अशा सौदर्यप्रसाधनांच्या वापरामुळेडोळ्यांच्या नाजूक त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
४) मधुमेह, रक्तदाब आणि टी. बी. असलेल्या रुग्णांनीआपल्या डोळ्यांची दरमहा तपासणी करावी.
