सुट्टे नाणे देता का ?

coins

एकीकडे संपूर्ण भारतात कोट्यावधीचे घोटाळे होत असतांना,बनावट चलनी नोटांचं प्रमाण वाडत असतांना …. लोकं मात्र त्रासली आहेत ती चिल्लर साठी.

सुट्टी नाणी हल्ली दिशेनाशी झाली आहेत. कुठल्याही दुकानावर अथवा हॉटेल्स वर,पान stall वर आपण काही खरेदी केली तर सुट्ट्या चिल्लर ऐवजी चोकलेट परत मिळत असत. त्यामुळे सुट्ट्या नाण्यांची खडखडात हल्ली ऐकायलाच येत नाही. शिवाय २५ पैशे ५० पैशे हे चलनातून हद्दपारच झाली आहेत. आधी लहान मुलं १ रुपयाचं coin मागायचे चोकलेट खाण्यासाठी आता मात्र coin मागितल्यावर direct चोकलेट हातात पडते.
रुपया घसरला तेव्हापासून त्याचा विसरच बाजारपेठेला पडला कि काय असा संभ्रम निर्माण होतो.
आता तर काही लोकं चिल्लर चक्क  टक्केवारी नुसार विकतांना दिसतात,(म्हणजे १०० रुपयात ९० रु.चि नाणी) बस मध्ये चढण्याच्या आधीच conductor सुट्टे आहेत का ? असं विचारतो आणि नसतील तर उतरा असे सांगतो,एखाद्या दुकानावर ५रु. च्या पुढचीच खरेदी करावी लागते कारण सुट्टे नाहीत असं म्हणून दुकानदार आपला धंधा करून घेतो. आपण मात्र नाईलाजाने गप्प राहतो .
 एकीकडे रिझर्व बँक १० रु,१०० रु,१००० रुपयाची नवी नाणी बनवीत असतांना बाजारात सुट्ट्या नाण्याची कमतरता म्हणजे चिंतेचा आणि चिंतनाचा विषय बनला आहे.
त्यामुळे कुणी सुट्टे नाणे देता का ? अशी हाक बाजारात नेहमीचं  ऐकायला मिळते.