सुरणाच्या पाल्याची भाजी

suranchi bhaji

साहित्य :-

१)      सुरणाचा कोवळा पाला

२)     भिजवलेली हरभरा डाळ अर्धी वाटी

३)     लाल मिरच्या एक-दोन

४)     दोन-तीन आमसुलांचं पाणी

५)    ओलं खोबरं अर्धी वाटी

६)      शेंगदाण्याचा कूट दोन चमचे

७)    गुळ , तिखट , मीठ .

कृती :-

१)      सुरणाची कोवळी पानं मधला दांडा वगळून बारीक चिरावीत .

२)     कढाईत फोडणीमध्ये सुक्या मिरच्यांचे दोन-तीन तुकडे तळून त्यावर भिजवलेली चणा डाळ टाकून परतावी .

३)     थोडी मऊ झाल्यावर सुरणाचा पाला टाकावा .  पाला परतून त्यावर आमसुलाचं पाणी शिंपडावं .

४)     मीठ , तिखट , गुळ घालून भाजी मंद आचेवर शिजू दयावी .  शेंगदाण्याचा कूट , खोबरं घालावं .

५)    अन्य पालेभाज्यांना आमसूलाच्या पाण्याची गरज नसते , परंतु सुरणाच्या पाल्यावर न विसरता आमसुलाचं पाणी शिंपडावं .