सुरण कढी

साहित्य :-surankadi

१)      सुरण पाव किलो

२)     उकडलेले बटाटे दोन-तीन

३)     तेल , कोर्नफ्लॉवर

४)     कसूरी मेथी , नारळ

५)    चिंच , गूळ

६)      कढीपत्ता , फोडणीचं साहित्य

७)    किसलेला कांदा , गरम मसाला एक चमचा

८)     डाळीचं पीठ अर्धा चमचा

९)      चवीनुसार मीठ .  

वाटण :-

१)      आलं , लसूण पाकळ्या चार-पाच

२)     मिरच्या तीन-चार , जिरं अर्धा चमचा

३)     बडीशेप पाव चमचा

४)     मसाला वेलची एक

५)    जायपत्री चिमुटभर

६)      मिरे दोन-तीन . 

कृती :-

१)      सुरण स्वच्छ करून फोडी कराव्यात .  त्या उकळत्या पाण्यात लिंबू रस व मीठ टाकून साधारण पाच मिनिटं शिजवाव्यात . 

२)     नंतर चाळणीवर ओतून पाणी काढून टाकावं .  उकडलेले बटाटे किसून त्यात उकडलेलं सुरण कुस्करून घालावं . 

३)     वरील वाटणापैकी निम्मं वाटण , चवीनुसार मीठ , हळद , कोथिंबीर , लिंबूरस एक चमचा व चिमुटभर साखर घालून मळून घ्यावं आणि या मिश्रणाचे लहान-लहान गोळे तयार करून तळून काढावेत . 

४)     चिंचेचा कोळ व गूळ , खजूर दोन , बेदाणे चार-पाच , काजू दोन , एकत्र करून मिक्सरमधून काढावं .  एका नारळाचं खोबरं काढून वाटून घ्यावं . 

५)    हिंग , कढीपत्त्याची फोडणी करून त्यात किसलेला कांदा उरलेलं निम्मं वाटण घालून परतावं . 

६)      लालसर रंग आल्यावर कसूरी मेथी , वाटलेलं खोबरं घालावं . 

७)    खरपूस परतल्यावर त्यात एक चमचा गरम मसाला व आधी तयार केलेला चिंचेचा सॉस , त्यात अर्धा चमचा डाळीचं पीठ घालून एकसारखं करून घालावं . 

८)     एक-दोन वाटया उकळत पाणी घालावं .  उकळलं की सुरणाचे तळलेले गोळे त्यात सोडावेत .  वरून कोथिंबीर घालावी .