सोन्याचे झाड…..

4895_images   उत्तरप्रदेशातील साधुबाबाच्या सोनेरी स्वप्नावर विश्वास ठेऊन सरकारी यंत्रणांनी सोन्याच्या शोधार्थ चालविलेले खोदकाम संपूर्ण जगत चर्चेचा विषय ठरले असतांनाच ऑस्ट्रेलियात मात्र चक्क सोन्याच्या झाडाचाच शोध लागला आहे. मात्र ह्या शोधाला शास्त्रीय आधार असल्याचा दावा  हा शोध लावणारी ‘कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन’ने (सीएसआयआरओे) केला आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियातील कालगुर्ली हा प्रदेश नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बाबतीत श्रीमंत मानला जातो. ह्या प्रदेशात अनेक दुर्मिळ औषधी वनस्पतींसोबत भूगर्भात धातूंचे साठेही आढळतात. १८व्या शतकात हा प्रदेश सोन्याच्या साठ्यांसाठी प्रसिद्ध होता. आजही ह्या भागात सोन्याचे साठे आढळून येतात.

सीएसआयआरओ चे संशोधक मेल लिंटर्न यांनी केलेल्या संशोधनानुसार जसे झाड भूगर्भातील पाणी शोषून घेते त्याचबरोबर ह्या भागातील निलगिरीच्या वृक्षांनी पाण्यासोबत सोन्याचे कणही शोषून घेतले आहेत. सोन्याचे हे कण भूगर्भातून सुमारे १०० फुट अंतरावरून शोषून घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे. उंच वाढणाऱ्या निलगिरीच्या वृक्षांची मुळेही खुपच लांबलचक असतात आणि खोलवर जातात. हो मुळे पाण्यासोबतच इतर पदार्थही शोषून घेतात. अशाचप्रकारे सोन्याचे कानही शोषून घेतल्याचे लिंटर्न सांगतात. निलगिरीच्या झाडणे शोषून घेतलेले हे सोन्याचे कण त्याच्या पानात साठतात. पानांना त्यांचा काही उपयोग नसल्याने पाने गळून पडतात. मेल लिंटर्न यांच्या ह्या संशोधनातून निदान भूगर्भातील सोन्याचे साठे सापडण्यास मदत होणार आहे. ज्या ठिकाणच्या निलगिरीच्या झाडांच्या पानांमध्ये सोन्याचे अंश सापडतील त्या ठिकाणी भूगर्भात सोन्याचे साठे असण्याची शक्यता असते.

One Comment