सोबत फुलांची

flower 1सध्या ताणतणाव कोणाला नाहीत? प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तणावाचा सामना करत असतो. काहीजण आपत्तीला इष्टापत्तीमध्ये परावर्तित करतात आणि विकास साधतात. अशा माणसांचा सकारात्मक दृष्टिकोन दिशादर्शक ठरतो. तणाव झेलण्याचा आणि तणाव असतानाही सर्वसामान्य आयुष्य जगण्याचे काही मंत्र आहेत. याचा अवलंब केल्यास व्यग्र आणि व्यस्त अवस्थेतही मानसिक संतुलन ढळत नाही. घरातलं आणि ऑफिसमधलं प्रसन्न वातावरण हा त्याचाच एक भाग आहे. आजूबाजूला सुगंधी फुलं असल्यास चित्तवृत्ती प्रफुल्लित राहते, हा अनेकांचा अनुभव असेल. फुलांचे अल्हाददायक रंग, वातावरणात प्रसन्नता ठेवणारा सुगंध, नानाविध आकार आणि वैशिष्ट्यपूर्ण सजावट यामुळे खोलीला आकर्षकता प्राप्त होतेच, त्याचबरोबर चित्तवृत्तीही प्रसन्न राहते. त्यामुळेच फक्त हॉलमध्ये फुलांचा वापर न करता सर्व खोल्यांमध्ये ताज्या फुलांच्या फुलदाण्या ठेवाव्यात. यासाठी बाजारातून महागडी फुलं आणली पाहिजेत असं नाही. आपल्या बागेतली फुलंही फुलदाणीत आकर्षक पद्धतीनं सजवता येतात.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *