सौंदर्यवर्धक बदामतेल

almond_oilबदाम पौष्टिक आणि स्वास्थ्यवर्धक आहे. बदामाने बलवृद्धी होते तसेच बुद्धी कुशाग्र होते. याच बदामाच्या तेलामध्ये अनेक औषधी घटक आढळतात. प्रत्येक ऋतूत बदामाच्या तेलाचा वापर योग्य ठरतो. या तेलात सौंदर्यवर्धक घटकांचा खजिना आहे. त्यामुळे रासायनिक द्रव्य न वापरता या नैसर्गिक तेलांचा वापर करायला हवा. चेहर्‍यावर सुरकुत्या असतील, तर बदामाच्या तेलात दही मिसळून १0 मिनिटे चेहर्‍यावर मसाज करावा. यामुळे त्वचेत आश्‍चर्यकारक बदल पाहायला मिळतो. मुरूमे आणि सुरकुत्या कमी होण्यासाठी साय आणि बदामाच्या तेलानं मालिश करावं. कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी बदामाच्या तेलाचं मालिश उपयुक्त ठरतं. अतिरेकी ताण अथवा अशक्तपणामुळे डोळ्याच्या खाली काळी वर्तुळे उद्भवतात. अशा वेळी डोळ्याच्या आजूबाजूला बदामाच्या तेलाचं मालिश योग्य ठरतं. बदामाची पावडर दुधात कालवून तयार होणारा पॅक लावल्यास त्वचेला अनेक पोषक तत्त्वांचा पुरवठा होतो आणि सौंदर्यवधर्नास मदत होते.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *