सौंदर्यवर्धनासाठी

naturalसध्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये मोठय़ा प्रमाणावर रसायनांचा वापर केला जातो. त्यामुळे बरेचदा ती त्वचेसाठी घातक ठरतात. अशा वेळी सौंदर्यप्रसाधनात घरीच उपलब्ध असणार्‍या पदार्थांचा वापर केल्यास फायदा होतो. सौंदर्यप्रसाधनांमध्ये जास्वंदीच्या फुलाचे तेल वापरता येईल. झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या किंवा त्यापासून तयार केलेले प्रसाधन तेलकट त्वचेसाठी वापरले जाते. चहामध्ये टॅनीन नावाचे द्रव्य असते. यामध्ये त्वचेस आराम देण्याची क्षमता आणि गुणधर्म असतात. म्हणूनच त्वचा काळी पडू नये यासाठी तयार केल्या जाणार्‍या सनस्क्रीनमध्ये याचा वापर होतो. कापराचाही वापर करावा. कापूर जंतुनाशक आहे. डाग घालवण्यासाठी तसेच त्वचेस आराम मिळण्यासाठी याचा उपयोग होतो. केळाचा गर त्वचेस उपकारक असतो. हा गर मुखलेपनासाठीही उपयुक्त ठरतो. याशिवाय काकडीचाही वापर करावा. काकडी थंड, उत्साहवर्धक आणि तजेला देणारी आहे. कोबीमध्येही भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ही भाजी ज्या पाण्यात शिजवण्यात आली आहे त्या पाण्याने चेहरा स्वच्छ करावा. त्यामुळे चेहर्‍याचे सौंदर्य खुलून दिसते. गाजरामध्येही ‘अ’ जीनवसत्त्व भरपूर असते. त्यामुळे आहारात गाजर असावे त्याचप्रमाणे गाजराचा गर लेप म्हणूनही लावावा.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *