सौंदर्यसाधना घरच्या घरी

beauty tipsघरच्या घरीचेहरा अधिक तजेलदार राहावा आणि त्यात स्निग्धता असावी यासाठी स्त्रिया जागरूक असतात. हे साधण्यासाठी विविध उपचार गरजेचे ठरतात. त्यादृष्टीने आहारात प्रोटिन्स, व्हिटामिन-ए आणि सी यांनी युक्त पदार्थांचा समावेश असावा.

रोज किमान आठ ग्लास पाणी आणि एक ग्लास गाजराचा रस घ्यावा. याबरोबरच मॉइश्‍चरायझरयुक्त क्रीमचाही वापर महत्त्वपूर्ण ठरतो. मॉइश्‍चरायझरयुक्त फाऊंडेशन क्रीम शुष्क त्वचेला चमकदार आणि सुंदर बनवते. हे मॉइश्‍चरायझर क्रीम घरीही बनवता येते. चार बदाम, दोन शेंगदाणे, दोन चारोळ्या, एक आक्रोड हे सर्व वाटून घ्यावे. त्यात चार छोटे चमचे साय, दोन छोटे चमचे काकडीचा रस, एक छोटा चमचा मध तसेच गुलाबपाणी एकत्र मिसळून पेस्ट तयार करावी. हे घरी बनवलेले मॉइश्‍चरायझर बाजारातील मॉइश्‍चरायझरपेक्षा अधिक दर्जेदार असते.