सौंदर्य प्रसाधने वापरताना…..?

bसौंदर्य प्रसाधने वापरतानाबाजारात येणार्‍या प्रत्येक सौंदर्य प्रसाधनाचा वापर करून बघण्याचं तंत्र अनेक महिला वापरतात; पण यामुळे त्वचेवर नकारात्मक प्रभाव पडण्याचा धोका असतो. त्वचेचा प्रकार लक्षात घेऊन प्रसाधनांची निवड करायला हवी. कोरड्या त्वचेसाठी कमीत कमी ३0 एसपीएफयुक्त माईश्‍चरायजरचा वापर योग्य ठरतो. तेलकट त्वचेसाठी कमीतकमी एसपीएफवाले माईश्‍चरायजर वापरावे. संवेदनशील त्वचा असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कुठलंही प्रसाधन वापरू नये. आजकाल बर्‍याचशा उत्पादनांमध्ये आयुर्वेदिक वनऔषधींचा वापर केल्याचा दावा असतो. मात्र लेबलवरील घटक बघूनच याची सत्यता जोखता येते. नैसर्गिक घटकांचा ९५ टक्के वापर असल्यासच ते प्रसाधन हर्बल म्हणता येईल. अन्यथा बरोबरीनं कृत्रिम रसायनांचा वापर असल्यास गफलत होण्याची शक्यता असते. त्वचेवर ब्लॅक हेड्स अथवा व्हाईट हेड्स असल्यास फेसपॅक, स्क्रब, क्लीन्झर वापरताना काळजी घ्या