सौख्याची गुढी आनंदाचा पाडवा….
|भारतीय हिंदू संस्कृतीत गुढी पाडव्याला अनन्य साधारण महत्व दिल गेल आहे,
हा दिवस सौख्याचा,आनंदाचा,स्नेहाचा,परंपरेचा,तसेच नववर्षाचा मानला जातो.
ह्या दिवशी घरावरती गुढी उभारली जाते,तसेच त्या गुढीला पुरणपोळीचा नैवद्य दाखवला जातो.
नवीन वर्षाच्या कालगणनेला प्रारंभ केला जातो.मुळात हिंदू नववर्ष म्हणून गुढी पाडवा ओळखला जातो.
गतवर्षामध्ये राहिलेल्या कामाचा आलेख नव्या वर्षामध्ये पूर्ण करण्याचा संकल्प ह्या दिवशी होतांना दिसतो.
प्रभू रामचंद्रांचा विजयोत्सव आणि त्यांच्या अयोध्या पुनरागमनाची आठवण युगे-युगे स्मरणात राहावी म्हणून त्याचं स्वागत विजयाची गुढी उभारून केल गेल,
आणि तीच परंपरा आजवर चालत आली आहे…
मुळात स्वैराचारातून निर्माण झालेल्या विकृतीला पर्याय म्हणून संस्कृती उदयास आली.
हि संस्कृती आहे मानवीय अस्मितेची,हि संस्कृती आहे वैदिक परंपरेची,हि संस्कृती आहे माणूसपण बळकटीची.
गुढी पाडव्याचा उत्सव हा चैतन्याचा उत्सव आहे,शौर्याचा उत्सव आहे.ज्यामुळे संस्कृती आणि सौजन्य जोपासलं जात आहे.
त्यामुळे ह्या नवीन वर्षातले आपले संकल्प पुढील वर्षापर्यंत स्मरणात राहण्यासाठी गुढी-पाडव्याच अनन्य साधारण महत्व आपण अजून सखोल पद्धतीने जाणून घ्यायला हव.
lai bhari bhau