स्टाईलीश केसांसाठी….

hairकेसांची निगा राखणं हे एक किचकट काम आहेच, पण त्याचबरोबर वेगवेगळ्या स्टाईलमध्ये केस सजवणं हेदेखील तितकंच किचकट काम आहे. बरेचदा यासाठी वेगवेगळी उपकरणं, जेल, स्प्रे यांचा वापर केला जातो. कर्लिंग, स्टेटनिंग यासाठी कृत्रिम रसायनांबरोबरच ब्लो ड्रायर अथवा हीट आयरनचा वापर अनिवार्य ठरतो. पण या उपायांचे केसांवर अनेक दुष्परिणाम दिसून येतात. म्हणूनच काही साध्या उपायाने तात्पुरत्या स्वरूपात हेच परिणाम मिळवता येण्याचा विचार करायला हवा. सरळ केसांना कर्ली लूक द्यायचा असल्यास ओले असतानाच केसांचे छोटेछोटे सेक्शन्स घेऊन वेण्या घालाव्या. या वेण्या रात्रभर तशाच ठेवाव्या आणि सकाळी सोडून केस विंचरावेत. यामुळे केस कर्ली भासतात. हा परिणाम मिळवण्याचा आणखी एक उपाय म्हणजे केसांचे सेक्शन छोटे सेक्शन करून आंबाडे घालून ठेवावेत आणि रिबीनीने बांधावेत. सकाळी सोडल्यानंतर केस वळणदार दिसतात. दिसणारा हा परिणाम केस धुवेपर्यंत टिकू शकतो. कर्ली केस सरळ करण्यासाठी ओले असतानाच विंचरून दोन भाग पाडून क्रॉस अवस्थेत ताणून बसवावेत आणि क्लिपांनी बांधावेत. यामुळे सोडल्यानंतर केस सरळ भासतात.