स्टायलिश टोट बॅग

Tote Bagटोट बॅगची बहार हल्ली आकर्षक वेशभूषेबरोबरच अँक्सेसरीजनाही महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यादृष्टीने एक महत्त्वाची अँक्सेसरी म्हणून बॅग्जचा उल्लेख करावा लागेल. पूर्वी बाजारहाट करण्यासाठी उपयोगात येणारी बॅग आजच्या फॅशनविश्‍वात स्टेट्स सिम्बॉल बनली आहे. सध्या या विश्‍वात बहर आहे तो टोट बॅगचा. सुविधाजनक आणि स्टायलिश असा हा प्रकार महिलांच्या पसंतीस उतरत आहे. यात ब्राइट रंगांची विशेष चलती आहे. ही एक ओपन बॅग असते. दोन्ही बाजूला आकर्षक कलाकुसर केलेली असते. भरपूर जागा असल्याने आवश्यक ते सर्व सामान ठेवता येते. या बॅग कापड्याच्या अथवा चामड्याचा बनवलेल्या असतात. जूटपासूनही या बॅग बनतात. सजावटीसाठी मणी, रेशमी लेस, रेशीम, कुंदन आदींची मदत घेतली जाते. सध्या टोट बॅग्जमध्ये मोबाईल पाऊच, साइड वॉलेट आदींचीही सोय असते. झीपवाले दोन तीन कप्पे असल्यास विशेष सोय होते. थंडीचा हंगाम लक्षात घेऊन गडद रंगाच्या टोट बॅग निवडणे योग्य ठरते. हिरवा, पिवळा, गुलाबी, लाल, इंडिगो आदी रंग विशेष खुलून दिसतात.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *