स्टायलिश फॅशन

jeansआजकाल कोणालाही विचारलं की तुमचा आवडता आऊटफिट कोणता? तर ती व्यक्ती कुठल्याही वयोगटातील असो, उत्तर एकच ते म्हणजे ‘जीन्स’.. आय लूक कुल इन जीन्स टी-शर्ट, इट फिल वेरी कम्फर्टेबल.. मुलीना हॉट, स्वीट, क्युट, बबली, टॉम बॉईश असे बरेचसे लूक क ॅरी करता येतात. मुळात स्टायलिश आणि ग्लॅमर दिसायचे असेल तर हा खरंच छान ऑप्शन आहे. बेल बॉटम जीन्सपासून सुरू झालेला प्रवास आज स्लीम फिट, ओवर फेडेड, नेरो बॉटम, क्विल्स, ग्रील्स, वॉश, स्ट्रेचेबल, कलर स्ट्रेच पेंट्स,थ्री फोर्थ, शॉर्ट जीन्स, स्कर्ट्स असे बरेचसे ऑप्शन आज तरुणांकडे असल्याने जीन्स ही त्यांची पहिली पसंद झाली आहे. मुळात जीन्समध्ये क ॅटेगरीज नाहीत की स्लिम-ट्रिम लोकच ती वापरू शकतात किंवा जर तुम्ही शॉर्ट असाल, जाड असाल, तर तुम्हाला सूट होणार नाही अशी पार्शालिटी त्यात नाही. म्हणून प्रत्येक जण त्याला आपल्या वॉर्डरोबमध्ये प्रथम प्राधान्य देतात. याउलट जीन्स लवकर खराब होत नाही, म्हणजे चांगली जीन्स तुम्ही तीन-चार वर्ष सहज वापरू शकता. म्हणून युज अँण्ड थ्रो असाही नाही. फॅ शनच्या दुनियेत जीन्स हे कधीच आऊटडेटेड होणार नाही. डेनिम, कार्गो, कोड्रा, लिवाइस, लुझर्स लि., स्पायकर्स असे बरेचसे ब्रॅँड तरुणांच्या आवडीचे आहेत. सण असो वा पार्टी, जीन्स कुठेही चालते. कुणाकडे पूजेला जायचं असेल तर जीन्स आणि कुडता असं कॉम्बी करून लोक मिरवतात. मुली असो वा मुले, जीन्समुळे स्वत:ची स्टाइल बनवता येते. कोल्हापुरी चपलांपासून ते स्लिपर्सही घालून हिंडता येते.