स्त्री-मुक्ती

valanस्त्री-मुक्ती कशाला करतोय आपण पोकळ वल्गना स्त्री-मुक्तीच्या…. जर होत असतील लहान,तरूण,विवाहीत,मतीमंद आणि निडर स्त्रियांवरही बलात्कार दिवसा ढवळ्या…. स्त्री मुक्त झाली कस म्हणणार जर समाज लादू पहात असेल बंधन त्यांच्या चालण्या- बोलण्यावर, राहण्या- वागण्यावर त्यांच्या स्त्री-सुलभ भावनेवर आणि स्त्रीच्याच गर्भात वाढणार्‍या स्त्रीचाच बळी घेत असेल ती गर्भात असताना… स्त्री-मुक्ती जर पुरूषांच्याच हातात असेल तर स्त्री – मुक्तीसाठी लढणार्‍या स्त्रियांचे बळी जातच राहणार हजारो वर्षापर्यत कदाचित पुढच्या… स्त्री-मुक्ती अस काही नसत जर स्त्रियांनी नाकारल पुरूषांना त्यांच्यावरील त्यांच्या वर्चस्वाला तर क्षणात येईल स्त्री-मुक्ती अस्तित्वाला… स्त्री – मुक्ती ही एखाद्या स्वप्नासारखी आहे दिसते पण प्रत्यक्षात येत नाही कारण ती प्रत्यक्षात येण्यासाठी स्त्रीयांना बळी द्यावा लागेल त्यांच्या स्त्रीत्वाचा जसा स्त्रीयांवर अन्याय करणार्‍यां पुरूषांनी दिलाय त्यांच्या पुरूषत्वाचा…. कवी- निलेश दत्ताराम बामणे.