स्पॉंज केक

साहित्य :-carrot-cake-ct-1585281-l

१)      दीड कप पिठी साखर

२)     सव्वा कप लोणी

३)     चार फेटलेली अंडी

४)     एक चमचा बेकिंग पावडर

५)    एक चमचा vhanila इन्सेस

६)      अर्धी वाटी टूटी फ्रुटी (ऐच्छिक)

७)    दोन कप मैदा

८)     चिमुटभर मीठ . 

कृती :-

१)      प्रथम परातीत लोणी आणि पिठी साखर हलकी होईपर्यंत फेसावं .  त्यात अंडी आणि मीठ , तसंच इन्सेस घालून सर्व एकजीव होईपर्यंत फेसावं . 

२)     मैदा आणि बेकिंग पूड एकत्र करून तीन वेळा चाळावं .  थोडया मैदयात टूटी फ्रुटी घोळवून बाजूला ठेवावी . 

३)     चाळलेला मैदा लोणी-साखरेच्या मिश्रणात हलक्या हातानं मिसळून एकजीव  करावा .  नंतर त्यात टूटी फ्रुटी मिसळावी . 

४)     एका ऐलुमिनियमच्या भांडयाला लोण्याचा हात फिरवून त्यात केकचं मिश्रण ओतावं .  गैसवर कुकरचं मुख्य भांडं तापत ठेवून त्यात वाळू पसरावी . 

५)    वाळू चांगली तापल्यावर त्यावर केकचं भांडं ठेवून गैस बारीक करावा . 

६)      दरम्यान शेजारच्या बर्नरवर बीडाचा किंवा लोखंडी तवा चांगला तापवून टो कुकरच्या तोंडावर ठेवावा . 

७)    शक्य असल्यास दोन तवे आलटून पालटून वापरावेत .  त्यामुळं केकला वरच्या बाजूनंही लालसर रंग येतो . 

८)     केक कडेनं सुटला आणि सुरी खुपसली असता कोरडी निघाली की केक भाजला गेलं असं समजावं .