स्माराकावरून वाद निर्माण होणे गैर

download (3)मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक होणार हे आता निश्चित झाले आहे. बाबासाहेबांचे कार्य दलित वर्ग आणि एकूणच भारतीय समाजाकरिता नक्कीच प्रेरणास्त्रोत राहिले आहे. म्हणून त्यांचे एखादे भव्य स्मारक व्हावे यावर कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, बाबासाहेब असो किंवा अन्य कुणीही महापुरुष त्यांच्या स्मारक, पुतळा व अन्य बाबींविषयी वाद निर्माण होणे व वारंवार मागणी किंवा आंदोलन होऊन हे विषय सतत चर्चेत राहणे नक्कीच खेदजनक आहे. असे केल्याने त्या महापुरुषांचा एकप्रकारे अवमानच होतो.

कारण, एखाद्या व्यक्तीच्या मृत्युपश्चात त्या व्यक्तीविषयी वाद उत्पन्न होणे गैर आहे. ज्या महापुरुषांनी आपले अवघे जीवन समाजाच्या जडणघडणीसाठी पणास लावले त्यांच्या नावाने जनतेला किंवा सरकारला वेठीस धरणे नक्कीच योग्य नाही. अशी एखादी मागणी झाल्यास त्यावर त्वरित विचार करून निर्णय घेऊन असे वाद निर्माण होणार नाही याची काळजी घेणे सरकारचे कर्तव्य आहे आणि ते त्यांनी चोख बजावायास हवे. अजूनही काही महापुरुषांची स्मारके बनविण्याच्या मागण्या होत आहेत. त्या मागण्यांवर कुठलाही वाद होऊ न देता सकारात्मक तोडगा काढला जाईल अशीच अपेक्षा करूया!

6 Comments