स्मार्ट टिप्स

tips1.लोकरीचे कपडे ठेवताना त्यामध्ये कडुलिंबाची पाने घालून

ठेवावी म्हणजे कपडे खराब होत नाहीत.

2.पिशवी किंवा बॅगेच्या चेनला व्हॅसलिन लावून ठेवावे

म्हणजे चेन गंजून नादुरुस्त होत नाही.

3.फाटलेली नोट चिकटवण्यासाठी त्यावर थोडासा साखरेचा

घट्टसर पाक लावावा आणि नोट सुकवावी म्हणजे चांगली चिकटते.

4.ऑरगंडी साड्या थोड्या वाळताच लगेचच इस्त्री करावी. यामुळे

इस्त्री चांगली होते तसेच फारसा त्रास होत नाही.

5. चप्पल, बूट पॉलिश करायचे असल्यास लिंबाची साल चोळावी आणि चांगले वाळल्यानंतर पॉलिश करावे.

यामुळे चकचकीत पॉलिश होते.

6.केस धुतल्यावर थोडेसे व्हिनेगर चोळल्यास ते मऊ आणि चमकदार होतात.

7.बेसिनमध्ये एखादी डांबरगोळी ठेवल्यास झुरळे येत नाहीत.