स्लिप अँप्नेया

Sleep-Apnea‘स्लिप अँप्नेया’ म्हणजे काय?
या आजारात झोपेत माणूस श्‍वास घेऊ शकत नाही किंवा त्याला श्‍वसनाला त्रास होतो. या आजाराचा सामना करणारा माणूस झोपेत घोरतो. या आजारामुळे व्यक्तीची झोप योग्यप्रकारे न झाल्याने त्याच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, तसेच त्याला दिवसा झोप येणे, अस्वस्थ वाटणे, चिडचिड होणे अशा तक्रारी होऊ लागतात. मद्यपान करणार्‍या आणि धूम्रपान करणार्‍या व्यक्तींमध्ये स्लिप अँप्नेयाची भीती अधिक असते.

‘स्लिप अँप्नेया’मुळे हृदयाचा आजार जडू शकतो किंवा रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. या आजाराबद्दल डॉक्टरांना पुरेशी माहिती नसते. त्यामुळे निदान होण्यास उशीर होतो किंवा निदानाच होत नाही .’स्लिप अँप्नेया’ या आजारामुळे श्‍वसनाला त्रास होतो. त्यामुळे झोपेत हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. झोप न येणे, घोरणे किंवा दिवसा अस्वस्थ वाटणे, झोप येणे या तक्रारी डॉक्टरांकडे घेऊन गेलेल्या रुग्णाला डॉक्टर इतर चाचण्या आणि तपासण्या सुचवतात; पण हा स्लिप अँप्नेया असावा, असा विचारही त्यांच्या मनात येत नाही .

डॉक्टरांमध्ये या आजाराबाबत विशेष जागृती नसल्याने रुग्णाची तपासणी करताना आजाराबाबत विचार केला जात नाही . बर्‍याचदा तपासण्यांमध्ये काहीच न आढळल्याने आजार झाला नसल्याचा निष्कर्ष काढून त्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे योग्य वेळी लक्ष दिल्यास बरा होणारा आजार अधिक बळावतो .