स्वच्छता अभियान

clean indiaआजच whatsapp वर एक मेसेज आला , त्यात एक मित्र शपथ घेत होता कि तो या पुढे आपल्या सभोवतालची स्वच्छता राखेल .
I, Sagar sharma. as a responsible citizen of India I will not throw any garbage/waste on road street but throw only in dustbin or location provided for same.
I shall also spread this massage to all my nearer n dearer ones.
I request to join clean India beginning with ourselves. ..

जय हिंद

भारत माता की जय  !!

 

हा मेसेज whats app वर सर्वत्र फिरत आहे .  माननीय प्रधानमंत्रीनि स्वच्छता अभियानाची सुरुवात २ ऑक्टोबर सुरु करण्याचे ठरवले आहे . पण मला असे वाटते या अभियानाची सुरुवात आपल्या घरापासूनच सुरु झाली तर अगदी योग्य ठरेल .

१. ओला आणि कोरडा कचरा वेगळा करून ठेवणे .

२.प्लास्टिक , कागद कोठेही न फेकता कचरा कुंडीत टाकणे .

३. आठवड्यातून २ तास आपल्या सभोवतालची , सर्वाजानिक जागांची , तसेच सरकारी इस्पितळांची साफ सफाई ठेवल्यास देशाच्या या अभियानास खरी उर्जा मिळेल .

४. हा संदेश फक्त टाईमपास म्हणून पुढे न सरकवता त्यावर अंमल करणे महत्वपूर्ण आहे . असाच मेसेज पाठवाण्या पेक्षा आपण हि गोष्ट आचरणात आणली तर फार बर होईल . हा अभियान खूप चांगला आहे . प्रधानमंत्रीनि या अभियानाची सुरुवात केल्यामुळे लोक सुद्धा या अभियानाल चांगल प्रतिसाद देतील . आपला देश , स्वच्छ देश होईल अशी आशा बाळगण्यात काही हरकत नाही .