स्वयंपाकघरातील टिप्स
|*इडलीचा घोळ करताना त्यात काही अर्धकच्चे तांदुळ मिसळावे याने इडली चांगली नरम येते.
*उकडलेली अंडी थंड पाण्यात ठेवल्यास त्याचे सालपट लवकर निघते.
*पोळयांच्या डब्यात अद्रकाचे एक दोन काप ठेवल्यास पोळया नरम राहतात.
*वडे बनविण्यासाठी बेसन मिसळल्यानंतर ते मिश्रण व्यवस्थीत आहे की नाही हे माहित करण्यासाठी मिश्रणाचे एक दोन थेंब एका कपभर पाण्यात टाकावे जर ते थेंब तरंगतील तर बेसनाचे मिश्रण योग्य झाले हे समजते.
*कुरकुरे भजे बनविण्यासाठी बेसनात थोडे मक्याचे पिठ टाकावे.
*अंडे उकडल्यास ज्या पाण्यात त्यास उकडायला टाकले आहे त्यात अर्धा चमचा विनेगर मिळवावे. अंडयाचे द्रव्य बाहेर येणार नाही.
*कारल्यामधील कडुपणा कमी करण्यासाठी त्यात मीठ घाला व अर्धा तासासाठी फ्रिजमधे ठेवा.
*हिरव्या भाज्या कापल्यावर त्यांना प्लास्टीक डब्यात ठेवु नये.
*कांदा दोन भागात कापून त्यास थंड पाण्यात ५-१० मिनीटे ठेवल्यास कापतांना डोळयात अश्रु येत नाहीत.
*बटाटे आणि कांदे एकत्र साठवु नये त्यामुळे बटाटे लवकर खराब होतात.
*बटाटयाचे चिप्स बनवितांना कापलेले कच्चे चिप्स थंड पाण्यात अर्धा तास ठेवल्यावर वाळवायला ठेवावेत त्याने ते फार क्रिस्पी बनतात.
*भेंडी ची भाजी बनवतांना त्यात १-२ लिंबुच्या रसाचे थेंब घातल्यास भेंडी चिकट होणार नाही.
*पुरी किंवा भजे तळतांना तेलात मीठ घातल्यास भज्यांमध्ये कमी तेल शोषल्या जाईल.
*पनीर ला तेलात फ्राय करण्यापेक्षा त्यास थंड पाण्यात ठेवल्यास पनीर नरम व स्पंजी होतात.
*हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्यांचा रंग जातो त्याकरता भाजी शिजवतांना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही.
