स्वराज्य आणि आजची लोकशाही

s
जुल्मांचा नांगर जेव्हा सामान्य रयतेच्या उरावरण फिरवला जात होता,यवनांच्या कत्तलखाण्यात हिंदुत्वाचा रक्तबीज भरला जात होता.तेव्हा हजारो सूर्यांची उष्मा घेऊन जन्माला आले छ.शिवराय..ज्यांनी आपल्या मनगटाच्या ताकदीवर मत्सुद्दी मुघलांची पाळ-मूळ उपटून फेकून दिली.ज्यांनी तलवारीच्या पातीवर निधड्या छातीवर मर्द मावळ्यांच्या रक्तानं आणि घामानं स्वातंत्र्यच बीज पेरलं,ज्यांनी स्त्री,स्वराज्य,धर्म आणि मानवीय अस्मितेची राखण केली.आणि साकार झालं हजारो वर्षांपासून इथल्या रयतेने पाहिलेले स्वातंत्र्याचं बिलोरी स्वप्न आणि निर्माण झाली जगातील पहिली लोकाभिमुख राज्यव्यवस्था स्वराज्य….रयतेच रायातेसाठी असलेलं स्वत:च राज्य म्हणजे स्वराज्य.
मुळात हे राज्य आपलं आहे,आपल्यासाठी आहे.हि भावनाच लोकांसाठी चमत्कारिक होती.
स्वराज्य म्हणजे उत्तम प्रशासन आणि मोकळे पणाने जगण्याचा लोकांना मिळालेला अधिकार.
जिथली राजवट हि वडिलोपार्जित नव्हती….जिथे अन्याय आणि अत्याचाराला जागा नव्हती
वतन आणि जाहीगीरीच्या नावावर लोकांना त्रास देणार्यांना क्षमा नव्हती
म्हणुनचं तर लाखो फितूर पैदा झाले तरी देखील स्वराज्याचा निव हलवू शकले नाही.
आणि आजपर्यंत स्वराज्यासारख दुसर प्रशःसन जन्माला आल नाही.
स्वराज्याचा काळ उलटला आणि ह्या देशावर इंग्रजांच राज्य आलं सुमारे १५० वर्ष त्यांनी राज्य केलं
मात्रअखेर क्रांतिकारकांच्या बलिदानाने १९४७ साली स्वातंत्र्याचा सूर्य उगवला.
आणि लिहिली गेली जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना.
आणि त्यातून निर्माण झाली लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेली लोकशाही..!
मात्र हि अभिव्यक्ती लोकांच्या पचनी पडली नाही.आणि उफाळून आला स्वैराचार.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा ह्या देशाची राज्यघटना लिहिली तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते
कि ह्या देशाची राज्यघटना लिहित असतांना मला फार कष्ट घेण्याची गरज पडली नाही
कारण माझ्या डोळ्यांसमोर शिवरायांच स्वराज्य उभं होत.आणि स्वराज्याच सुराज्य ह्या लोकशाहीत
होईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला होता.
मात्र घडलं भलतंच भर दरबारात आपल्याच लोकांकडून विवस्त्र झालेल्या द्रौपदीसारखी इथल्या
लोकशाहीची अवस्था झाली,न्यायदेवता आंधळी झाली,प्रशासन पांगळ झालं,
आणि फक्त न फक्त बघ्यांची संख्या वाढत गेली.
महापुरुषांनी पाहिलेली स्वप्न धुळीला मिळाली,राजकारणाने समाजकारण गिळंकृत केले,
कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले.आणि बघता बघता आजची लोकशाही पूर्णत्वाने
खिळखिळी झाली.जिथं काळी माणस स्वराज्यासाठी सूर्यासारखी पेटायची तिथ आज त्यांचे वारसदार
काजव्यासारखे लुक्लुक्तांना पाहून लाज वाटते,त्यांच्या षंढ पणाची म्हणूनच म्हणावस वाटत………
माफ करा राजे नव्या लोकशाहीत जागतो आहे ,समाजाचं अधपतन उघड्या डोळ्यांनी बघतो आहे .
कायदा आणि सुव्यवस्थेला कुणी भीत नाही राजे,सुभेदाराची सूनही येथे सुरक्षित नाही राजे
काय तो स्वराज्याचा काळ होता,रायगडावरून फतवा निघायचा “सर्वांना पोटासी लावणे आहे..”असा फर्मान काढला जायचा आणि इथल्या कष्टकरी,गोरगरीब,शेतकरी जनतेच्या डोळ्यात आनंद अश्रू तरायाचे,आजची लोकशाही अजूनही “अच्छे दिन आने वाले हे ” अस म्हणत चांगल्या दिवसाची वाट बघत आहे.स्वराज्यात ३५० किल्ले होते आणि प्रत्येक किल्ल्याचा कारभार रायगडावरून उत्तमरीत्या चालायचा…..आजच्या लोकशाहीत मात्र भाषावार प्रांत देऊनही मराठी कानडी वाद मिटत नाही.दक्षिण भारतीय अजूनही हिंदी भाषेला राष्ट्रभाषा मानायला तयार नाहीत,काश्मीर-हैद्राबाद येथे दिवसा ढवळ्या तिरंगा पेटविला जातो.कारण हि लोकशाही आपली आहे हा देश आपला आहे हि बांधिलकी लयास गेली आहे.
लाख मेले तरी चालतील मात्र लाखांचा पोशिंदा मारता कामा नये अशी म्हणणारी माणसं स्वराज्यात होती,आजच्या लोकशाहीत मात्र माणसं मेली तरी चालतील परंतु TRP घटता कामा नये असं वक्तव्य करणारी मध्यम निर्माण झाली आहेत.
कारण सत्तेसाठी आणि पैशासाठी चटावलेल्या जिभेला काळ्जाच कितीही पाणी करून पाजलं तरी त्याची तहान भागात नाही,भरकटलेल्या लोकशाहीवर जेव्हा खूळ सरकार राज्य करत तेव्हा सामन्यांची आर्त किंचाळी त्यांच्या कानी पोचत नाही.
स्वराज्यामध्ये जेव्हा रांझेगावच्या पाटलाने एका शेतकरयाच्या मुलीवर बलात्कार केला होता तेव्हा महाराजांनी त्याचे हात पाय कलम केले होते त्या नंतर स्वराज्यामध्ये एकही बलात्कार झाला नव्हता.मात्र आजच्या लोकशाहीत दिल्ली मध्ये जेव्हा सामुहिक बलात्कार होता बलात्कार करणार्यांना फाशीची शिक्षा देखील दिली जाते तरी देखील बलात्काराच्या घटना सरता सरत नाहीत.तेव्हा स्वराज्य आणि लोकशाही मध्ये असलेली तफावत लक्षात येते.
औरंगजेब स्वराज्याचा सर्वात मोठा शत्रू आपल्या सैन्याला नेहमी सांगायचा कि शिवाजी बहोत बडा योद्ध हे कोई बडी बात नाही,उसके पास ३५० किले हे कोई बडी बात नाही.अस तो २०-२५ वेळा म्हणायचा परंतु तो शेवटी तो अस म्हणायचा लेकीन उसका एक भी आदमी बिकाऊ नाही था ये कोई छोटी बात नाही. आजच्या लोकशाही मध्ये गांधींचे विचार किती आत्मसात केले हे कुणी विचारात नाही तर आमच्या खिशात गांधीचा फोटो असलेल्या किती नोटा आहेत ह्यावरून आमची लायकी ठरवली जाते .
दोस्तहो स्वराज्याची कमान तेथल्या मावळ्यांनी पेलून धरली होती,म्हणूनच स्वराज्य उत्तम प्रशासनाचा नमुना ठरलं आजच्या ह्या लोकशाहीच्या पतनाला आपणच कारणीभूत आहोत त्यामुळे…….हि लोकशाही द्रुड करण्याचा प्रयत्न आपणच करायला हवा.इतिहासातून शिकण्यासारख खूप आहे….. कारण
लोकशाही आहे जगातील स्वर्ग
जिथे सारे वर्ग एक होती
लोकांनीच करावे राज्य लोकांवर
याहुनी सुंदर काय आहे
त्यामुळे आपल्या महापुरुषांच्या विचारांशी प्रामाणिक राहा आणि लोकशाहीचे पाईक बना.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *